स्थैर्य, नाशिक, दि. 03 : तुकाराम मुंढेे १३ वर्षांच्या सेवाकाळात 12 पेक्षा जास्त वेळा बदल्यांचा अनुभव घ्यावा लागला. त्यांच्या बदल्यांचे कारण हर प्रामाणिक व धडाडीचे कामच असल्याचे दिसून आले आहे. अशा या धडाकेबाज, ध्येयवेडे व प्रामाणिक सनदी अधिकारी तुकाराम मुंढेे.
बीड जिल्ह्यात ताडसोना या लहानशा गावात तुकाराम मुंढे यांचा जन्म झाला.त्यांचा जन्म ३ जून १९७५ ला झाला. त्यांनी आणि त्यांच्या बंधूनी जिल्हा परिषदेच्या शाळेत दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांचे वडील सावकाराच्या कर्जात बुडाले होते. घरच्या संस्कारात तुकाराम मुंढे यांना प्रामाणिकपणा, सत्य आणि बेडरपणा शिकण्यास मिळाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम हरिभाऊ मुंढे आहे.मुंढे हे अतिशय उज्वल विद्यार्थी होते. त्यांनी आपले उच्चशिक्षण औरंगाबाद येथून पूर्ण केले. त्यांचे इतिहास, सामाजिक शास्त्र मधून त्यांनी बीए ही पदवी प्राप्त केली, सोबतच राज्यशास्त्र घेऊन एमए पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर २००१ मध्ये त्यांनी राज्य सेवा परिक्षेत प्राविण्य मिळवले व त्यांना दुस-या दर्जाची वित्त विभागात नोकरी मिळाली. ही निवड प्रक्रिया काहीशी वेळखाऊ असल्याने त्यांनी दोन महिने जळगावमध्ये व्याख्याता म्हणून काम केले.
त्यानंतर मे २००५ ला यशदा पुणे येथे प्रशिक्षणादरम्यान ते केंद्रीय सेवा परिक्षेत उत्तीर्ण झाल्याचे समजले. विशेष म्हणजे ते देशात २० वे आले होते आणि तेथून त्यांचा हा बेडर प्रवास सुरु झाला. तुकाराम मुंढे यांच्या सेवेची सुरवात सोलापूरातून झाली, नंतर त्यांची बदली धरणी या आदिवासी भागात प्रकल्प अधिकारी म्हणून झाली तिथून त्यांची बदली नांदेडला उपजिल्हाधिकारी म्हणून झाली. २००८ साली नागपूर जिल्हा परिषदेवर जेव्हा त्यांची सीईओ म्हणून निवड झाली. त्याच दिवशी त्यांनी काही शाळांना भेट दिली. त्यात त्यांना अनेक शिक्षक गैरहजर दिसले. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या सर्व शिक्षकांचे निलंबन केले. तेव्हापासून १०-१२ टक्के असणारे शिक्षकाचे गैरहजरीचे प्रमाण १-२ टक्क्यावर आले. वैद्यकीय कारभारातील अनियमितता पाहून त्यांनी काही डॉक्टरांना निलंबित केले. इतिहासात पहील्यांदाच सीईओ डाॅक्टरला निलंबित केले होते.
२००९ सालीच नागपूरवरून त्यांची बदली नाशिकला ‘अतिरिक्त आदिवासी आयुक्त’ पदावर करण्यात आली, हे पद खास त्यांच्यासाठीच तयार केले होते. पुढे मे २०१० ला मुंबईला KVIC ला CEO म्हणून बदली झाली. नंतर त्यांची जालन्याला कलेक्टर म्हणून बदली झाली. जिथे जेल तिथे आपल्या कामांनी वेगळीच छाप पाडत असत. जायकवाडीवरून जालन्याला पाणी आणण्याचे काम सहा वर्षापासून रखडले होते त्यांनी तीन महीन्यात ते करून दाखवून जालनाकरांची तहान भागवली.
पुढे २०११-१२ साली त्यांनी सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर पद सांभाळले. सप्टेंबर २०१२ साली त्याची बदली मुंबई, विक्री व कर विभागाच्या सह आयुक्तपदी झाली. त्यांच्या काळात १४३ कोटी रूपयांचा महसूल ५०० कोटीवर गेला. जलयुक्त शिवार योजनेमध्ये त्यांनी सोलापूरातील २८२ गाव घेतले. या गावातील कामे त्यांनी फक्त १५० कोटी रूपयांमध्ये केले. यात लोकांचे योगदान ५०-६० कोटींचे होते. वर्षाला ४०० टँकर लागणार्या सोलापूरात टँकरची संख्या ३०-४० वर आली.
सोलापूर मध्ये असताना मुंढे याना पंढरपूर येथील वारीची जबाबदारी देण्यात आली होती आणि मंदिर समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. वारीच्या वेळी सर्वात मोठा धोका साथीच्या रोगांची शक्यता असते कारण १४-१५ लाख लोकं यावेळी वारीला हजेरी लावतात.त्यापैकी बहुतांश उघड्यावर शौचविधी करतात त्यातून नदी प्रदूषित होते.परंतु पंढरपूर मंदिर समितीच्या चेअरमनपदी असताना अवघ्या २१ दिवसात आषाढी वारीच्या वारकऱ्यांसाठी ३ हजार शौचालयाची व्यवस्था त्यांनी केली. त्याचवेळी मुख्यमंत्री सोडता इतर वी.आय.पी. दर्शन त्यांनी बंद केले.
नवी मुंबई मनपा आयुक्तपदी असताना ‘आयुक्तासोबत चाला’ चा कार्यक्रम जनतेत चांगलाच गाजला. रुजू झाल्यापासून त्यांनी कित्येक कामचुकार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. अनेक अधिकाऱ्यांचे बेशिस्त वागणूक, कामातील अनियमितता इत्यादी कारणामुळे निलंबन केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी नवी मुंबई मधील वाहतुकीची अडचण ओळखता, रस्त्याच्या बाजूला बसणारे फेरीवाले व अनधिकृत विक्रेते यांना चाप लावला ज्यामुळे नवी मुंबईकर सुखावला खरा,पण अनेकांचा रोषही त्यांनी ओढून घेतला. पुढे त्यांची बदली न होण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली.
पुणे महानगरपालिकेच्या पीएमपीएल चे अध्यक्ष आहेत. महीन्याला पीएमपीएल ची ६ लाख लोकांची असणारी ग्राहकसंख्या ९ लाखांवर गेली. पुणे परिवहन बस ही देशातील पहिली रियल टाइम इ -टिकीटींग बस म्हणून दावा करण्यास सज्ज झाली आहे. एएफसीएस यंत्रणेमुळे मुख्याधिकारी केंव्हाही या तिकीटींग यंत्रणेवर नियंत्रण आणि निरिक्षण करू शकतात. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये ४० टक्के वरून शंभर टक्के अशी वाढ गेल्या तीन महिन्यात झाली आहे.
नंतर २०१८ मध्ये नाशिकमध्येही धडाकेबाज कामगिरीमुळे सत्ताधारी आणि मुंढे यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. नाशिककर मात्र सातत्याने मुंढे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले होते. या संघर्षाचा मुंढे यांच्या बदलीत झाला आहे.
अशा या धडाकेबाज, ध्येयवेडे, प्रामाणिक, बेडर आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यास सलाम, मुंढे सरांचा प्रेरणादायी जीवनप्रवास खरंच प्रेरणा देणारे आहे.