मंगळवार दि. 24 मार्च रोजी पुणे येथे डाक अदालत


स्थैर्य, 13 मार्च, सातारा : पोस्टाच्या सेवे विषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधनकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींचे निवारण करण्यासाठी पोस्ट मास्तर जनरल, पुणे रीजन यांच्या कार्यालयामध्ये 24 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजता 79 वी डाक अदालत आयोजित करण्यात येणार आहे.

या डाक अदालतमध्ये विशेषत: टपाल वस्तु, मनी ऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र इत्यादि बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा उदा. तारीख व ज्या अधिकार्‍यास मुळ तक्रार पाठविली असेल त्याचे नांव व हुद्दा इत्यादी. संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार सहा. पोस्टमास्टर , पोस्टमास्टर जनरल, पुणे क्षेत्र, पुणे 411001 यांचे नावे दोन प्रती सह दिनांक. 16 मार्च पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशारितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही. असे पोस्टमास्टर जनरल, पुणे रीजन यांनी कळविले आहे.


Back to top button
Don`t copy text!