दैनिक स्थैर्य । दि. ०३ नोव्हेंबर २०२२ । सातारा । न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या ॲट्रॉसिटी प्रकरणांविषयी सरकारी अभियोक्त्यांशी पत्रव्यवहार करावा. तसेच ही प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना निवसी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक आज संपन्न झाली. त्यावेळी श्री. थोरवे यांनी या सूचना केल्या. यावेळी सहायक आयुक्त समाज कल्याण नितीन उबाळे यांनी जिल्ह्यातील ॲट्रॉसिटी प्रकरणांची माहिती दिली.
पोलीस विभागाकडून ॲट्रॉसिटी प्रकरणी प्रलंबित असलेल्या व निर्गत करण्यात आलेल्या प्रकरणांचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला. तसेच प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
यावेळी जिल्हा दक्षता समितीचे सदस्य उपस्थित होते.