
दैनिक स्थैर्य । दि. २२ डिसेंबर २०२१ । नवी दिल्ली । अखिल भारतीय स्तरावरील कोचिंग फेडरेशन ऑफ इंडिया या २८ राज्ये आणि ५ केंद्रशासित प्रदेशातील फेडरेशन म्हणून संघटीत असलेल्या कोचिंग फेडरेशन ऑफ इंडीयाचे ट्रस्टी म्हणून सातारा (महाराष्ट्र) येथील पी. कुलकर्णी क्लासेस आणि पी-एज्युकुल डिजीटल लर्निंग सोल्यूशन्सचे डायरेक्टर प्राचार्य डॉ. पी. कुलकर्णी (सातारा) यांची सर्व संमतीने आणि एकमताने निवड झाली.
या जबाबदारीसह डॉ. पी.कुलकर्णी सीएफआयचे ब्रेन स्टाॅमिंग कमिटीचे चेअरमन आणि प्रोफेशल टीचर्स असोसिएशन महाराष्ट्रचे लिगल ॲडव्हाईजर म्हणून पहिल्यापासून काम पहात आहेत. माजी प्राचार्य असलेले डॉ. पी. कुलकर्णी हे सध्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे ॲडव्हाईजर म्हणून कार्यरत आहेत. तसेच कॉमर्स शाखेतील दैदिप्यमान निकालांनी महाराष्ट्रात प्रसिध्द असलेले पी. कुलकर्णी क्लासेसचे डॉ. पी. कुलकर्णी संचालक आहेत. सध्या पी. कुलकर्णी सर पी-एज्युकुल डिजीटल लर्निंग सोल्यूशन्स या डिजीटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि दिल्ली बोर्डच्या इ. ११ वी – १२वी आणि भारतातील ६००+ हून अधिक विद्यापीठातील शिक्षण घेणाऱ्या पदवी आणि पदव्यूत्तर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाद्वारे मार्गदर्शन करणाऱ्या मोठ्या प्रकल्पावर कार्यरत आहेत.
याशिवाय पीटीए महाराष्ट्र, सीएफआय न्यू दिल्ली आणि एनबीएफसी, काही बँका यांच्या संयुक्त प्रयत्नातून कोरोना काळात खचलेल्या पालकांना, शिक्षकांना, शाळा, महाविद्यालये, खाजगी विद्यापीठ यांना शून्य टक्के व्याज दराने शैक्षणिक फीसाठी कर्जपुरवठा, वैयक्तिक कर्जे, संस्थात्मक कर्जे, प्रीपेड क्रेडिट लाईन कार्डस् इ. योजनांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या मोडून पडलेल्या शिक्षण क्षेत्राला उभारी देण्यासाठी कार्यरत आहेत.
भारतीय पातळीवर कार्य करताना कोरोना संकटामुळे खचलेल्या खाजगी शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षक, संस्था चालक, पालक – विद्यार्थी यांना नवीन दिशा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी अनुभवी असलेले डॉ पी. कुलकर्णी महत्वपूर्ण भूमिका बजावतील असा विश्वास सर्व ट्रस्टींच्या वतीने यावेळी व्यक्त करण्यात आला.
सीएफआयच्या ट्रस्टी आणि पदाधिकारी निवडीसाठी झालेल्या मिटींगसाठी सीएफआय चे जनरल सेक्रेटरी आलोक दीक्षित (न्यू दिल्ली) यांनी एक्झिक्युटीव्ह ट्रस्टी म्हणून असलेल्या अधिकारात कामकाज पार पाडण्यात महत्वपुर्ण भुमिका पार पाडली. मिटींगमध्ये सर्व निर्णय एकमताने घेण्यात आले.
डॉ पी. कुलकर्णी यांचे या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.