यवतेश्वर रोडवरील पॉवर हाऊसनजीक ट्रक चोरीस


स्थैर्य, सातारा, दि.२८: यवतेश्वर रोडवर पॉवर हाऊस येथील युवराज टायर दुकानानजीकच्या वळणाजवळ लॉक करुन पार्क केलेला दहा चाकी ट्रक अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी शाहुपुरी पोलिसांत तक्रार गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मंगेश किसन निकम रा. कोडोली सातारा यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांच्या टाटा कंपनीच्या दहा चाकी ट्रकवर (क्र MH – 04 – FD – 4892) त्यांनी अमोल रघुनाथ नलवडे वय 37 वर्षे , रा. 689 पॉवर हाउस , मंगळवार पेठ , सातारा यास चालक म्हणुन ठेवलेले होते. सदरचा ट्रक तो माल पोहचवुन आला की , बोगदा ते यवतेश्वर जाणारे रोडवर पॉवर हाऊस येथील युवराज टायर दुकानाचे शेजारी असले वळणाजवळ लॉक करुन पार्क करीत असे. दि .19 एप्रिल रोजी सकाळी 08.00 वा घरात असताना चालक नलवडे याने फिर्यादीला फोन करुन सांगितले की , दि.18 रोजी रात्रौ 10 चे सुमारास नेहमीच्या जागी पार्क केलेला ट्रक दिसुन आला नाही. फिर्यादी तातडीने सदर ठिकाणी गेले. दोघांनीही ट्रकचा आजुबाजूला तसेच सातारा शहर परिसरात शोध घेतला परंतु तो कोठेही मिळुन आला नाही. दरम्यान ट्रकचा चालक अमोल रघुनाथ नलवडे हा दि .23 / 4 / 2021 रोजी मयत झाला.
अखेरीस फिर्यादीने शाहुपुरी पोलीस ठाण्यात ट्रक चोरी झाल्याची तक्रार दिली.


Back to top button
Don`t copy text!