दैनिक स्थैर्य । दि. १५ मार्च २०२२ । मुंबई । ट्रूक हा उच्च दर्जाचे वायरेलस स्टिरिओज, वायरलेस हेडफोन्स, इयरफोन्स आणि साऊंड व्यावसायिक तसेच संगीततज्ञांसाठी एक उत्तम उपकरण देणाऱ्या भारतातील आघाडीचा ऑडिओ ब्रॅण्ड साहसी व्यक्ती आणि आऊटडोअर उत्साहींसाठी २९९९ रूपयांच्या लाँच किंमतीमध्ये बहुप्रतिक्षित कस्टम-बिल्ट ट्रूक होरिझोन डब्ल्यू२० स्मार्ट वॉच लाँच करण्यास सज्ज आहे. होरिझोन अॅडवेन्चर स्मार्टवॉचमध्ये बिल्ट-इन हाय-प्रीसिशन जीपीएससह ग्लोनास, डीप वॉटर रेसिस्टण्ससह आयपी६८ रेटिंग, मल्टीपल-स्पोर्टस् मोड आणि जवळपास १६८ तासांपर्यंत टिकणारी विशाल बॅटरी आहे. हा स्मार्टवॉच फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल.
या स्मार्टवॉचमध्ये ४३ मिमी (१.६९ इंच) टाइप फुल स्क्रीन टच एचडी कलर डिस्प्लेसह २४०x२८० पिक्सल्सचे रिझॉल्युशन आणि सुधारित कनेक्टीव्हीटीसाठी ब्ल्यूटूथ ५.० आहे. तसेच या स्मार्टवॉचमध्ये अनेक महत्त्वपूर्ण हेल्थ मॉनिटरिंग वैशिष्ट्ये आहेत- जसे २४x७ हार्ट-रेट सेन्सर, ब्लड प्रेशर मॉनिटर, ट्रू ब्लड ऑक्सिजन लेव्हल (एसपीओ२), पेडोमीटर आणि स्लीप मॉनिटर. बिल्ट-इन ९-अॅक्सिस ग्रॅव्हिटी सेन्सर तुम्हाला तुमच्या सर्व दैनंदिन कृतींची अचूकपणे नोंदणी करण्याची सुविधा देते. सुधारित कार्यक्षमतेसाठी ३०० एमएएच क्षमतेची बॅटरी जवळपास ४५ दिवसांपर्यंत स्टॅण्डबाय टाइम देते.
तसेच बॅटरी जीपीएस फंक्शनशिवाय जवळपास १६८ तासांपर्यंत आणि जीपीएस फंक्शनसह जवळपास १२० तासांपर्यंत कार्यरत राहते. बॅटरी पॉवर सेव्हिंग मोडसह जवळपास १४ दिवसांपर्यंत कार्यरत राहू शकते. स्मार्टवॉचमध्ये इतर सर्वोत्तम वैशिष्ट्यांमध्ये स्मार्ट नोटिफिकेशन्स, डीएनडी मोड, सेडेण्टरी रिमांइडर, वेदर अपडेट, म्युझिक कंट्रोल आणि प्रत्येक प्रसंगासाठी नवीन लुककरिता १०० हून अधिक क्लाऊड आधारित वॉच फेसेस आदींचा समावेश आहे.
ट्रूक इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पंकज उपाध्याय म्हणाले, “भारतीय स्मार्टवॉच विभाग अपवादात्मक प्रमाणासह विकसित होत आहे आणि आम्ही या उदयोन्मुख विभागामध्ये प्रवेश करणे स्वाभाविक होते. आम्हाला दृढ विश्वास आहे की, आमचा दर्जात्मक अॅडवेन्चर स्मार्टवॉच रोमांचसाधक व आऊटडोरअर उत्साहींसाबत तंत्रज्ञान व दर्जासंदर्भात तडजोड न करू पाहणा-या व्यक्तींमध्ये देखील सुपरहिट ठरेल.”