दैनिक स्थैर्य | दि. २६ डिसेंबर २०२४ | फलटण |
फलटणमधील कुरेशीनगरातील आखरी रस्ता येथे फलटण-लोणंद रस्त्यावरील स्मशानभूमीसमोर अज्ञात ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिल्याने मोटारसायकलस्वार (क्र. एमएच११डीएफ८६१५) कदीर निसार कुरेशी (वय ३५, रा. कुरेशीनगर, आखरी रस्ता, फलटण) हा युवक ठार झाला आहे. हा अपघात दि. २४ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडला.
या अपघातप्रकरणी फलटण शहर पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे करत आहेत.
कदीर कुरेशीने हेल्मेट घातले नव्हते, त्यामुळे धडकेनंतर त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.