दैनिक स्थैर्य | दि. 18 डिसेंबर 2023 | फलटण | महाराष्ट्र स्टेट चॅम्पियनशिप कराटे राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा नुकतीच वसई, मुंबई येथे पार पडली. अत्यंत वेगवान अवघड समजल्या जाणाऱ्या कराटेसारखे स्पर्धेत त्रीशाने सुवर्णपदक मिळवत सातारा जिल्ह्याचा नावलौकिक वाढवीला आहे. सहा वर्षीय त्रिशाला तिच्या पालकांनी गेल्या वर्षभरापासून कराटे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सदरबाजर सातारा येथे ती शिक्षण घेत आहे. तिच्या यशात प्रशिक्षक उमेश राठोड, वडिल योगेश जाधव, आई अमृता जाधव तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका यांचे मोलाचे योगदान लाभले.
त्रिशा योगेश जाधवचे (मूळ गाव – शेरेवाडी, ढवळ) व सध्या सदर बाजार सातारा येथे स्थायिक असणाऱ्या त्रिशाने वसई, मुंबई येथे ६ ते ११ वयोगटातील राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत इतिहास रचत कराटे मध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.
लहानपणापासूनच कराटेमध्ये आवड असणाऱ्या अवघ्या सहा वर्षाच्या त्रिशा जाधवने पदार्पणातच राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून सातारचे नाव उंचावले आहे. तिच्या यशाबद्दल सर्वत्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आई वडिलांच्या प्रोत्साहनामुळे तिने कराटे स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविले आहे. येणाऱ्या काळात त्रिशा निश्चितच ऑलम्पिक स्पर्धेत ही देशाचे नेतृत्व करेल अशी अपेक्षा त्रिशाचे वडील योगेश जाधव यांनी व्यक्त केली.