
दैनिक स्थैर्य । 18 मे 2025। सातारा । पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यास ऑपरेशन सिंदूर मोहिमेतून चोख प्रत्युत्तर देणार्या भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ सातारा जिल्ह्यात जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर मंगळवार दिनांक 20 मे तिरंगा रॅली आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहे.
तिरंगा रॅलीमध्ये चार चाकी वाहनावर भारत मातेची एक प्रतिमा लावून देशभक्तीपर गीते लावावे. तसेच रॅलीत समाविष्ट असणार्या मोटरसायकली व तत्सम वाहनावर तिरंगा झेंडा लावावा.याशिवाय रॅलीत सहभागी झालेल्या जास्तीत जास्त नागरिकांनी हाती देखील तिरंगा झेंडा घ्यावा.
या तिरंगा रॅलीमध्ये स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी तसेच स्थानिक नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असेही आवाहन पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले आहे.