दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑगस्ट २०२२ । सातारा । स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत लोणंद येथे नगरपंचायतच्या वतीने प्रशासन व शालेय विद्यार्थ्यांसह जनजागृतीपर रॅली काढण्यात आली.
लोणंद नगरपंचायत येथून जनजागृतीपर रॅलीस सुरुवात करण्यात आली. या रॅलीत खंडाळ्याचे तहसिलदार दशरथ काळे, स्वातंत्र्य सैनिक आण्णा सापते, लोणंदच्या नगराध्यक्षा मधुमती पलूगे- गालिंदे, उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके-पाटील , मुख्याधिकारी चेतन कोंडे, नगरसेवक रविंद्र क्षीरसागर, सचिन शेळके-पाटील, सागर शेळके-पाटील, गणीभाई कच्छी, राशिदा इनामदार, भरत शेळके-पाटील, असगर इनामदार, भरत बोडरे, सागर गालींदे, बंटी खरात आदी मान्यवरांसह जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी , मालोजीराजी विद्यालयातील विद्यार्थी, कन्या शाळेतील विद्यार्थीनी व शिक्षक तसेच लोणंद नगरपंचायतचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हर घर तिरंगा अभियानांतर्गत काढण्यात आलेली रॅली लोणंद नगरपंचायत पटांगणापासून सुरुवात करून लोणंदच्या मुख्य बाजारपेठतून पुन्हा नगरपंचायत अशी काढण्यात आली. या रॅलीत विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या. रॅलीत चालू असताना वाहतूक विस्कळीत होवू नये म्हणून लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.