दैनिक स्थैर्य । 29 नोव्हेंबर 2024 । फलटण । थोर समाजसुधारक ‘क्रांतीसुर्य’ महात्मा जोतीराव फुले यांची पुण्यतिथी दि.28 रोजी संपन्न झाली.
यानिमित्त शहरातील महात्मा फुले चौक येथील अर्धपुतळ्यास फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील, माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अॅड.सौ.जिजामाला नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सदस्य बापूराव जगताप आदींसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पुष्पहार अर्पण करुन महात्मा फुले यांना अभिवादन केले.