
दैनिक स्थैर्य । 27 एप्रिल 2025। फलटण । येथील जैन सोशल ग्रुप, संगिनी फोरम व युवा फोरमच्यावतीने जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आपले प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, रविंद्र बेडकीहाळ, शहर पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा, जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्रीपाल जैन, सचिव निना कोठारी, संगिनी अध्यक्षा मनिषा व्होरा, माजी अध्यक्षा सौ. अपर्णा जैन, खजिनदार विनयश्री दोशी, संचालक राजश्री महाजन, निलम डुड्डु, जयश्री उपाध्ये, नेहा दोशी, दीपिका व्होरा, युवा फोरम सचिव सिद्धेश शहा, खजिनदार मिहीर गांधी व सदस्य जिनेंद्र गांधी, यश डुड्डु, मयुर गांधी, ओंकार शहा, सौ.किर्ती शहा, जैन सोशल ग्रुपचे माजी अध्यक्ष तुषार गांधी, राजेंद्र कोठारी, डॉ. सूर्यकांत दोशी, उपाध्यक्ष प्रीतम शहा, सचिव हर्षद गांधी, विशाल शहा, सदस्य राजेंद्र सवळे, श्रीकांत सवळे, सागर समर्थ, राहुल शहा, अतुल शहा, अनंतकुमार उपाध्ये, दिशा शहा, मोना गांधी, मयुरी शहा, शिल्पा व्होरा, आशा शहा, अंकिता शहा, अनुपमा दोशी, मेघा दोशी, रमणलाल रणदिवे, डॉ.विवेक शहा, ओम जैन, दिव्या शहा व जैन श्रावक-श्राविका उपस्थित होते.
यावेळी अरविंद मेहता, रविंद्र बेडकिहाळ, श्रीपाल जैन यांनी झालेल्या घटनेबद्दल समयोचित भाषणे केली. सर्वानी मेणबत्ती हातात घेऊन मृत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केली.