दिवंगत सदस्यांना विधानसभेत आदरांजली


दैनिक स्थैर्य । दि. २३ डिसेंबर २०२१ । मुंबई । दिवंगत सदस्यांना विधानसभेत आदरांजली वाहण्यात आली. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शोकप्रस्ताव मांडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसमहसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिवंगत सदस्यांप्रती शोकभावना व्यक्त केल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेनागरिकांच्या समस्या सोडविण्याची आग्रही भुमिका सातत्याने मांडणारे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने एक चांगला सहकारी आपण गमावला आहे. ते कोल्हापूरच्या सामाजिकशैक्षणिकसांस्कृतिक क्षेत्रातले लोकप्रिय व्यक्तिमत्व होते. फुटबॉल खेळाडू आणि फुटबॉलचे पाठीराखे म्हणूनजिल्ह्याच्याराज्याच्या क्रीडा क्षेत्रात चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते. कोल्हापूर उद्योग सहकारी सोसायटीचे संचालक म्हणून त्यांनी उत्तम कार्य केले. उद्योगांच्या माध्यमातून त्यांनी अनेकांच्या हाताला रोजगार दिला. एक सचोटीचा उद्योजक अशीच त्यांची प्रतिमा होती. अशा भावना उपमुख्यमंत्री यांनी शोकप्रस्तावाद्वारे मांडल्या.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणालेध्यास घेऊन काम करणारे समर्पित व्यक्तिमत्व हरवले असूनउद्योजक संघटनेत काम करत असताना त्यांना समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणालेदिवंगत आमदार चंद्रकांत जाधव हे यशस्वी उद्योजक आणि क्रिडा क्षेत्रासाठी कार्य करणारे व्यक्तिमत्व होते. त्यांचे कार्य हे शिदोरी म्हणून आपणासमवेत कायम राहील.

यावेळी विधानपरिषद सदस्य शरद रणपिसेमाजी विधानसभा सदस्य गणपतराव देशमुखमाजी मंत्री मखराम पवारमाजी मंत्री उमाजी सनमडीकररंगनाथ वाणीकांती कोळीराऊ पाटीलअनुपचंद शाहसिद्रामप्पा आलुरेनागनाथराव रावणगावकरसंतोषराव दसपुतेमधुकर ठाकूरमाणिकराव जगतापसुरेश इंगळे या माजी विधीमंडळ सदस्यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!