
स्थैर्य, रहिमतपूर, (अविनाश कदम) दि 18 : आज सम्पूर्ण जग कोरोना विरोधात झगडत असताना चा य ना ने कारण नसताना सीमेवर आपल्या जवानांवर भ्याड हल्ला केला या हल्ल्यात एक वरीष्ठ अधिकाऱ्यासह आपले वीर जवान शहीद झाले सारा देश शोक सागरा त बुडाला या हल्ल्याचा रहिमतपूर नागरिक व नगर परिषदेच्या वतीने त्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून चायनाच्या या भ्याड कृत्याचा जाहीर निषेध करतो असे प्रतिपादन रहिमतपूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा कोरे यांनी केले.
चीनच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम नगरपालिका कार्यालयात आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी माजीं नगराध्यक्ष वासुदेव माने काका होते प्रास्ताविक उपनगराध्यक्ष माधुरी भोसले यांनी केले सूत्रसचलन नगरसेवक विद्याधर बाजारे यांनी केले आभार नगरसेवक शिवराज माने यांनी मानले.
माजी नगराध्यक्ष वासुदेव माने काका म्हणाले वीर जवानांना श्रध्दाजली अर्पण करून चीनला धडा शिकवण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकांनी चीनचा कोणताही माल खरेदी करण टाळून स्वदेशी बनावटीच्या माल खरेदी केली पाहिजे. मोबाईल इलेक्ट्रॉनिक वस्तू tiktok सारखे चीनला आर्थिक मदत मिळणाऱ्या वस्तू खरेदी बंद केली पाहिजे.
यावेळी उपनगराध्यक्षा माधुरी सतिश भोसले विरोधी पक्षनेते निलेश माने विद्याधर बाजारे रहिमतपूर विभाग पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम यांनी समयोचित मनोगते व्यक्त केली. यावेळी नगरसेवक शशिकांत भोसले, अनिल गायकवाड, पोलीस पाटील दीपक नाईक, विनायक पाटील आर. सि. माने राणे घाडगे चव्हाण सर्व कर्मचारी उपस्थित होते.