दैनिक स्थैर्य | दि. १० डिसेंबर २०२३ | बारामती |
राज्यस्थानमधील स्वर्गीय सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यावर भ्याड हल्ला करून त्यांना ठार मारण्यात आले. त्याचा निषेध म्हणून शनिवार, ०९ डिसेंबर रोजी बारामती तालुक्यातील सर्व राजस्थान व्यापारी बांधवांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली व भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला.
याप्रसंगी बारामती तालुक्यातील सर्व राज्यस्थानी व्यापारी बांधव व माँ कामधेनू गोशाळा ग्रुप बारामतीचे पदाधिकारी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विवेक पांडकर, सुधाकर पांढरे, दीपक पेशवे, विनोद पवार, मा. उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव व माँ कामधेनू गोशाळा ग्रुपचे दुर्गाराम चौधरी, राजुशेठ चौधरी, ताराराम देवासी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सुखदेव सिंह गोगामेडी यांची ५ डिसेंबर रोजी भर दिवसा राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या केली होती. सुखदेव सिंग राष्ट्रीय करणी सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. राजपूत समाजाचे मोठे नेते होते व समाजासाठी त्यांचे मोठे योगदान होते. तसेच राज्यस्थानमधील इतर समाजासाठी सुद्धा त्यांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे.
ज्यांनी हत्या केली त्या हत्यारांना लवकरात लवकर अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी यावेळी माँ कामधेनू गोशाळा ग्रुप बारामती यांच्याकडून करण्यात आली.