
दैनिक स्थैर्य । दि. २६ फेब्रुवारी २०२२ । मुंबई । दिवंगत आमदार व उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष आर एन सिंह यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उत्तर भारतीय संघ, मुंबईच्या वतीने आज (दिनांक 26) उत्तर भारतीय संघ भवन येथे एका शोकसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिवंगत आर एन सिंह यांना श्रद्धांजली वाहिली.
शोकसभेला उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष संतोष आर एन सिंह व इतर मान्यवर उपस्थित होते.