दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑगस्ट २०२४ | फलटण | रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट फलटण तालुक्याच्या वतीने श्री. लालासाहेब अहिवळे यांना पोलीस खात्यात उपनिरीक्षकपदी बढती मिळाल्याबद्दल आरपीआय पक्ष कार्यालय, बारामती चौक, फलटण येथे पक्षाचे जिल्हा सचिव विजय येवले यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष राजू मारुडा, जिल्हा कार्यकारणी सदस्य संजय निकाळजे, अध्यक्ष फलटण तालुका सतीश अहिवळे, उपाध्यक्ष फलटण शहर तेजस काकडे, पत्रकार शक्ती भोसले, संग्राम अहिवळे, रोहित माने, दयानंद पडकर, चंद्रकांत काकडे सर, गणेश भोईटे, सूरज अहिवळे, रंजित बंगाली, सुभाष काकडे, बापूराव नामदास, पदाधिकारी, कार्यकर्ते या सर्वांनी अहिवळे यांना उपनिरीक्षकपदी बढती मिळाल्याबद्दल शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले.