
दैनिक स्थैर्य । दि. १९ डिसेंबर २०२२ । नागपूर । विधानपरिषदेत दिवंगत सदस्यांना शोकप्रस्तावाद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी विधानपरिषद सदस्य सुरेश विठ्ठलराव पाटील, प्रभाकर अनंत संत, शांताराम पुंजाजी आहेर यांच्या निधनाबद्दल उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शोक प्रस्ताव मांडला. यावेळी सभागृहात दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. हा शोकप्रस्ताव एकमताने संमत करण्यात आला.