आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना रिक्षा संघटनेतर्फे अभिवादन


स्थैर्य, फलटण, दि. ०७ सप्टेंबर : भारताचे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची २३४ वी जयंती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेच्या वतीने फलटण येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष दीनेश अहीवळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे राजे उमाजी नाईक हे महाराष्ट्रातील पहिले सशस्त्र क्रांतिकारक होते. आपल्या पहिल्या उठावाद्वारे त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले आणि क्रांतीचे स्वप्न पाहणारे ते निधड्या छातीचे वीर ठरले.”

या कार्यक्रमास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष सनी कदम, उदय काकडे, महेंद्र काकडे, राजेंद्र गोडसे, देवा चव्हाण, प्रेम काकडे, बापु मदने, किशोर मोरे, प्रशांत अहीवळे, राजेंद्र माने, प्रमोद चव्हाण, अक्षय अहीवळे, धनंजय सोनवलकर, अक्षय लोंढे, संजय मोरे, दादा काकडे, योगेश पोरे, राजाभाऊ देशमुख, सुरेश कोलवडकर, किशोर अहीवळे, विजय अहीवळे, नीलेश रीटे, रत्नेश्वर निकाळजे, बाळासाहेब मोरे यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!