बालासुब्रमण्यम यांना श्रद्धांजली : ‘तुमच्यामुळेच पहिल्यांदाच लोकांना अजय-अतुल हे नाव कळले’, एसपी बालासुब्रमण्यम यांच्या आठवणींना गहिवरले अजय-अतूल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.२५: प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालासुब्रमण्यम यांची आज कोरोनाशी झुंज अखेर संपली. गेल्या 5 ऑगस्ट रोजी कोरोनाच्या संक्रमणामुळे एसपींना चेन्नईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र गुरुवारी त्यांची प्रकृती खालावली आणि आज उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बालासुब्रमण्यम यांना श्रद्धांजली वाहिली असून लोकप्रिय गायक आणि संगीतकार अजय-अतुल यांनीदेखील त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

अजय अतुल यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहून त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली आहे. तुमच्यामुळेच लोक पहिल्यांदा आम्हाला ओळखू लागले, असे त्यांनी म्हटले आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, ”तुम्ही आम्हाला आमंत्रित केले म्हणून आम्ही 1996. मध्ये मद्रास (चेन्नई) मध्ये येऊ शकलो. आपल्या विनंतीमुळे आम्ही दोघेही आमचे देव आणि गुरु श्री. इलाया राजा यांना भेटू शकलो, त्यांच्यासोबत आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय वेळ घालवू शकलो त्यांना बघू शकलो.”

अजय-अतुल पुढे म्हणतात, ”तुम्ही आमच्यासारख्या दुस-या राज्यातील नवख्या मुलांवर विश्वास ठेवला म्हणून आमचा विश्व विनायका हा पहिला अल्बम वेगवेगळ्या भाषेत रिलीज होऊ शकला. आणि तुमच्यामुळेच पहिल्यांदाच लोकांना अजय-अतुल हे नाव कळले. धन्यवाद हा शब्द पुरेसा नाही सर. आपला आवाज आणि आठवणी कायम आमच्याबरोबर असतील. तुम्ही कायम आमच्या अंत:करणात राहाल,” अशा शब्दांत त्यांनी एसपींना श्रद्धांजली वाहिली आहे.

अजय अतुल यांच्या विश्व विनायका या पहिल्या अल्बमधील सहा गाणी बालासुब्रमण्यम यांनी स्वरबद्ध केली होती. हा अल्बम खूप गाजला होता.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!