स्थैर्य, लोणंद, दि. ०८: सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, प्रदेश प्रतिनिधी व खंडाळा तालुक्याचे काँग्रेसचे जेष्ठ नेते अॅड.बाळासाहेब बागवान यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लोणंद ता.खंडाळा येथे राधेशाम पॅलेस या ठिकाणी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आलेले होते.
कै, एडवोकेट बाळासाहेब बागवान यांनी खंडाळा तालुक्याचा शाश्वत विकासाचे ध्येय ठेवून सर्व धर्म समभाव जोपासत गोरगरीब कष्टकरी जनता शेतकऱ्यांसाठी अखेरपर्यंत तडफेने काम केले असे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले खंडाळा तालुक्यातील सर्वपक्षीय नागरिकांच्या वतीने येथे आयोजित शोकसभेत रामराजे बोलत होते यावेळी माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण आमदार मकरंद पाटील आमदार दीपक चव्हाण जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश जाधव जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे नितीन भरगुडे आनंदराव शेळके पाटील मनोज पवार प्राध्यापक एस वाय पवार चंद्रकांत ढमाल रवींद्र डोईफोडे वंदनाताई धायगुडे-पाटील नगराध्यक्ष सचिन शेळके राजे द्र डोईफोडे साजिद बागवान सरफराज बागवान आदींची प्रमुख उपस्थिती होती श्री लिंबाळकर म्हणाले एडवोकेट बाळासाहेब बागवान मोठ्या मनाने तितकेच हटटी स्वभावाचे होते पाणीप्रश्न त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता धोम-बलकवडी च्या पाण्यासाठी ते बरोबर होते नीरा-देवघर पाण्यासाठी त्यांचा संघर्ष कायम होता निष्ठेचे आणि तत्त्वाचे राजकारण करणाऱ्या पैकी ते होते सर्वसामान्यांच्या गोरगरिबांच्या हितासाठी सत्तेचा वापर सामान्यांसाठी करत राहिली त्यांचा विचार पुढे नेला पाहिजे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमचा बाळासाहेबांशी संबंध आला आमच्या मातोश्री यांच्यासमवेत काम करताना त्यावेळी काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांची फळी त्यांनी उभी केली होती त्यामध्ये बाळासाहेब अग्रस्थानी होते शेतीला पाणी मिळण्यासाठी खंडाळा तालुक्यातील शेतकरी कष्टकरी व गोरगरीब जनता सुखी होणार यासाठी त्यांनी तळमळीने पाणी पंचायतीमध्ये काम केले.
बाळासाहेबांचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करणे हीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली असेल,बहुजन समाजाचे नेतृत्व गेल्याने पोरके झालो,लोणंदचा आधारवड गेला,काँग्रेस पक्षाची खूप मोठी हानी झाली आमदार मकरंद आबा पाटील म्हणाले कार्यकर्त्यांवर निस्सीम प्रेम करणारा नेता म्हणजे बाळासाहेब,पक्षाशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहणारा नेता म्हणजे बाळासाहेब, बाळासाहेबांनी जाती पातीचे नव्हे तर सर्वधर्मसमभावाचे राजकारण शिकविले आदी प्रतिक्रिया शोकसभेत व्यक्त करण्यात आल्या. दादासाहेब शेळके, रविंद्र डोईफोडे, राजू इनामदार आदींनी मनोगत व्यक्त करताना बाळासाहेबांच्या जीवन प्रवासावर तसेच त्यांच्या जुन्या आठवणीना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली. यावेळी शोकसभेचे सूत्रसंचालन बाबा लिम्हण यांनी केले.शोकसभेच्या शेवटी पसायदान घेण्यात आले.