क्रांतिवीर शैक्षणिक संकुलनात वृक्षारोपण करताना स.पो.नि.गणेश वाघमोडे. |
स्थैर्य, म्हसवड दि. २७ : दुष्काळी माण तालुक्यात वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन म्हसवड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे यांनी केले.
म्हसवड येथील क्रांतीवीर शैक्षणिक संकुल प्रांगणात ए.पी.आय. गणेश वाघमोडे यांच्या हस्ते पन्नास लिंब वृक्ष वानाची नुकतीच लागवड करण्यात आली . यावेळी संस्थाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर ,संस्था सचिव सौ. सुलोचना बाबर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना गणेश वाघमोडे म्हणाले क्रांतिवीर शैक्षणिक संकुल एक उपक्रमशील संकुल असून अल्पावधीत या संकुलाने नावलौकिक मिळवलेला आहे. यापूर्वी क्रांतीवीर शाळा व इतर शाखांनी वृक्षारोपण व बीजारोपण मध्ये मोठा सहभाग घेतला असून शाळेला राज्यस्तरावरील वनश्री पुरस्कार मिळालेला आहे. कोरोना कालावधीत शाळेने ऑनलाइन शिक्षण प्रणाली राबवली असून ही बाब उल्लेखनीय आहे.
या उपक्रमात क्रांतीवीर शाळा, क्रांतीवीर इंग्लिश मिडियम मधील मुख्याध्यापक अनिल माने, अनुरूप के. के . तुकाराम गाडगे, सागर बाबर, सुवर्णा टाकणे, सलमान मुल्ला याबरोबरच म्हसवड पोलीस प्रतिनिधी रवींद्र डोईफोडे इत्यादी मान्यवर सहभागी झाले होते.