साखरवाडी परिसरात वृक्षारोपण संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ जुलै २०२१ । फलटण । फलटण तालुक्यातील साखरवाडी येथील 7 सर्कल परिसरात साखरवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे औचित्य साधून मराठी पत्रकार परिषद फलटण शाखेच्या पदाधिकार्‍यांचा सत्कार समारंभ पार पडला.

यावेळी महानंदा दूध डेअरीचे व्हाईस चेअरमन डी के पवार, माजी सरपंच विक्रमसिंह भोसले, माजी सभापती शंकरराव माडकर, श्रीराम कारखान्याचे व्हाईस चेअरमन नितीन शाहूराजे भोसले, साखरवाडी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष उमाकांत भोसले, विनोद जाधव, बांधकाम व्यावसायिक संजय भोसले, पंचायत समितीच्या माजी सभापती रेश्मा भोसले, विद्यमान सरपंच रेखाताई जाधव, उपसरपंच अक्षर रुपनवर, ग्रामसेवक पांडुरंग येळे, श्री दत्त इंडियाचे प्रशासकीय अधिकारी अजित जगताप, फलटण तालुका साखर कामगार युनियनचे राजेंद्र भोसले, पोपट भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दादा जाधव, मराठी पत्रकार परिषद फलटणचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा रमेश आढाव, उपाध्यक्ष युवराज पवार, सचिव विक्रम चोरमले, सहसचिव दीपक मदने, खजिनदार अमोल नाळे, प्रसिद्धीप्रमुख सतीश जंगम, संघटक विजय भिसे, ज्येष्ठ पत्रकार श्रीरंग पवार, यशवंत खलाटे पाटील, अनिल पिसाळ, किसन भोसले, शक्ती भोसले, गणेश पवार, वैभव गावडे, अनमोल जगताप, सतीश कर्वे, बिलकीस शेख, अभिषेक सरगर, आदींसह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व सेवक वर्ग उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!