दैनिक स्थैर्य | दि. ३ जुलै २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटण, ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनवडी खुर्द येथे सोमवार, दि. १ जुलै रोजी कृषी दिनानिमित्त सकाळी ९ ते ११ या वेळेत वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी कृषी सहाय्यक सुनीता इंगळे, सरपंच श्रीमती सूर्यवंशी शालन, उपसरपंच सोनवलकर शरद, व्हा. चेअरमन सूर्यवंशी सचिन, सरचिटणीस सोनवलकर अक्षय, मुख्याध्यापक शिंदे वैशाली, शिक्षिका चांगण वैशाली, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्वप्रथम शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत वृक्षदिंडी काढण्यात आली व नंतर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मेजर दयानंद बाळासाहेब सोनवलकर व अश्विनी दयानंद सोनवलकर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना वाढते प्रदूषण व त्यासाठी झाडांचे महत्त्व पटवून दिले. वड, पिंपळ, आंबा, नारळ, कारंज, कदंब इ. झाडे लावण्यात आली. उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, कार्यक्रम अधिकारी प्रा. जे. व्ही. लेंभे, कार्यक्रम अधिकारी डॉ. ए. के. अभंगराव, कार्यक्रम समन्वयक प्रा. ए. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानकन्या खराडे वर्षा, माळी अस्मिता, गोसावी क्रांती, काशीद अमृता, शिंदे स्नेहल, गलांडे शिवानी यांनी कृषी दिनानिमित्त वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम साजरा केला.