
दैनिक स्थैर्य । 5 जुलै 2025 । गोखळी । येथील श्रीराम पतसंस्थेच्या वतीने हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण व वृक्षांना संरक्षक जाळ्यांचे कुंपण करुन देण्यात आले आहे.
यापूर्वी पतसंस्थेच्या वतीने गोखळी येथील स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण करून त्यांना सुरक्षा गार्ड बसवून बोअरवेलव्दारे ठिंबक सिंचन राबवले होते. यामुळे वृक्षांची चांगले प्रकारे जोपासना झाली आहे.
यावेळी पतसंस्थेचे संस्थापक डॉ. शिवाजीराव गावडे, संचालक डॉ. हणमंत गावडे, माजी सरपंच रमेश गावडे, प्राचार्य सस्ते, व्यवस्थापक महेश जगताप, बाळासाहेब धनवडे, पप्पू जगताप व विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.