माण तालुका रहिवाशी संघाच्या वतीने वृक्षारोपण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ जुलै २०२२ । बारामती । राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावाढदिवसाच्या निमित्त कन्हेरी वन उद्यान येथे माणतालुका रहिवाशी संघ यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले यावेळी विविध प्रकारची वन औषधी व देशी झाडे लावण्यात आली.याप्रसंगी माणवासीय रहिवाशी संघांचे शशिकांत देशमुख,काशिनाथ जळक ,प्रा.अशोक देवकर,भाऊसाहेब गायकवाड,आप्पासो भांडवले,पिंटू खाडे,अनिल पांढरे,हणमंत खाडे पेंटर,पिंटू गायकवाड सर,उमेश पांढरे,सुशांत पांडकर आणि इतर सदस्य उपस्थित होते,यावेळी अजितदादा पवार यांचा वाढदिवस केक कापून झाडांसोबत वन उद्यानात साजरा करण्यात आला. झाडे जगवण्याची जबाबदारी माणवासीय रहिवाशी संघातर्फे घेण्यात आली या मध्ये खत, पाणी पुरवठा व ट्री गार्ड यांची व्यवस्था करण्यात आली असून 15 ऑगस्ट रोजी उद्यान व्यवस्थापक यांच्या कडे सर्व साहित्य सुपूर्द करणार असल्याचे प्रा उमेश पांढरे यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!