बारामती कृषी महाविद्यालयाच्या कृषीदुतांतर्फे वाखरी येथे वृक्षारोपण

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत औषधी वनस्पतींची लागवड; विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती


स्थैर्य, फलटण, दि. ०६ ऑगस्ट : बारामती येथील कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चरच्या कृषीदुतांनी ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव’ कार्यक्रमांतर्गत वाखरी (ता. फलटण) येथे औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात हा उपक्रम राबविण्यात आला.

हे कृषीदुत सध्या आपल्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून वाखरी येथे निवासी आहेत. विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच औषधी वनस्पतींचे महत्त्व समजावे आणि पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण व्हावी, या उद्देशाने त्यांनी शाळेच्या आवारात विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड केली.

यावेळी कृषीदुत सार्थक खरात, पृथ्वीराज जगताप, यशवर्धन कवटकर, निखिल कालेकर, वरद देशमुख, प्रथमेश कुंभार, ओंकार कोकाटे आणि आदित्य केकाण यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.


Back to top button
Don`t copy text!