महसूल सप्ताहानिमित्त फलटण तालुक्यात वृक्षारोपण; आमदार सचिन पाटलांच्या हस्ते शुभारंभ


दैनिक स्थैर्य । दि. 03 ऑगस्ट 2025 । फलटण । महसूल सप्ताहाचे औचित्य साधून आज फलटण तालुक्यात पाणंद रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. फलटण-कोरेगाव मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते या पर्यावरणपूरक उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर आणि तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी मार्गदर्शन केले. तसेच, निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे आणि तलाठी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव अहिवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शासकीय जमिनी आणि पाणंद रस्ते हिरवेगार करण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या उपक्रमात महसूल विभागाचे कर्मचारी, अधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमामुळे तालुक्यातील पर्यावरणाच्या संवर्धनाला हातभार लागणार असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.


Back to top button
Don`t copy text!