पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त झिरपवाडीतील गोशाळेत वृक्षारोपण व गोमाता पूजन

यशवंत बाबा गोपालन संस्थेचा उपक्रम; जीवदया प्रेमी आणि मान्यवरांची उपस्थिती


स्थैर्य, फलटण, दि. २० सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त, येथील झिरपवाडीमधील ओम परमपूज्य परमहंस सद्गुरू श्री यशवंत बाबा गोपालन संस्थेमध्ये विविध सेवाकार्यांचे आयोजन करण्यात आले होते. जीवदया आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गोमातांना गोग्रास देऊन त्यांचे पूजन करण्यात आले. तसेच, संस्थेच्या परिसरात वड, पिंपळ, कदंब, कडुलिंब, जांभूळ यांसारख्या विविध देशी वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी फलटण आणि बारामती परिसरातील श्री. पटेल परिवार, श्री. सोमाणी परिवार, श्री. गादिया परिवार यांच्यासह अनेक व्यावसायिक, गोभक्त आणि जीवदया प्रेमी नागरिक उपस्थित होते. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा भारतीचे बारामती जिल्हा अध्यक्ष श्री. प्रसाद गायकवाड यांनीही आपली विशेष उपस्थिती नोंदवली.

उपस्थितांनी या सेवा उपक्रमाचे कौतुक केले. श्री यशवंत बाबा गोपालन संस्थेच्या वतीने कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व देणगीदार आणि मान्यवरांचे आभार मानण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!