विजापूर प्रवास

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २० ऑगस्ट २०२२ । आटपाडी । कर्नाटक राज्यातील विजापूर येथे दिनांक १८/०८/२०२२ रोजी कामानिमित्त प्रवास करणेचा योग आला. त्याचे कारण साहित्यरत्न डॉ. शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी, जि. सांगलीच्या कार्यकारी मंडळातील एक सदस्य मयत झालेमुळे शासकिय कामकाजासाठी दाखला आवश्यक होता. त्या मुळे गुरुवारी १८ तारखेस सकाळी आटपाडीहून निघालो भिवघाटहून कर्नाटकच्या बस मध्ये बसलो विजापूरची दोन तिकिटे काढली माझ्या सोबत शिवाजीराव पाटील माजी सरपंच हे सुध्दा ‘होते. साधारण आटपाडी ते विजापूर १६२ कि.मी. चे अंतर आहे. भिवघाट ते तिकोडा हे सरळ रस्ता आहे तिकोडातून विजापूरला जाणारा रस्ता अहो. रस्ता चांगला असलेमुळे आम्ही १२ वाजता विजापूरात पोहोचलो.

कर्नाटकातील विजापूर हे जिल्हयाचे ठिकाण आहे. विजापूर हे इतिहासकालीन नगर होते. आदिलशहाच्या राजधानीचे गांव होते. विजारपूरच्या बस स्टँडवर उतरलो रिक्षामध्ये बसलो व त्यास जाणेच्या ठिकाणचा पत्ता सांगितला रिक्षा सुरु झाली रिक्षा मधुन जाताना शहर गजबजले दिसले रस्ते अरुंद होते शहरात अनेक मस्जिदी आहेत. बुरुज तट मोडकळीस आलेला किल्ला पाहिला तट व बुरजाचे अवशेष दिसत होते. मुलूख मैदान तोफ पाहिली विजापूरचा इतिहास आठवायला लागला कर्नाटक व महाराष्ट्रातील भाग विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात होता. त्याचे राज्य होते. त्यानी अनेक जहागिया व सनदा दिलेचा बखरीत उल्लेख आहेत. सन १७०३ मध्ये विजापूरचा आदिलशहा, हैद्राबादचे निजाम, बेदचे बादशहा यानी मुंगी पैठण येथे एकत्र येवून इनामे व वतने जाहिर केली. त्यानुसार विजापूरच्य आदिलशहाने कर्नाटकातील व महाराष्ट्रातील २४ लाख सरदार, शिपाई, गावकामगार इत्यादी लोकांना वतनाच्या व

इनामाच्या सनदा दिलेल्या आहेत. त्याच बरोबर हक्क व अधिका-याच्या सुध्दा सनदा दिलेल्या होत्या अशा या ऐतिहासिक शहरातून रिक्षातून जात असताना डोळ्यापुढे इतिहास डोळ्यापुढे येऊ लागला.

रिक्षावाल्याने विजापूरच्या सराफ गल्लीत रिक्षा थांबवली आम्ही खाली उतरलो सराफ गल्लीतील मिलन बार जवळील शिंदे ज्वेलर्स मध्ये गेलो. शिवाजीराव पाटील यांचे नातेवाईकाचे शिंदे ज्वेलर्स, चे दुकान होते त्यानी आम्हास पाहिले ओळखले नमस्कार घातला, ज्वेलर्सचे मालक हणमंत शिंदे यांनी अगत्यपूर्व स्वागत केले आस्थेवाईकपणे चौकशी केली. शिंदे हे जखीनवाडीचे स्वभावाने सज्जन होते चहापाणी झालेनंतर दाखल्याबाबत चर्चा झाली. त्यानी फोन करुन विजारपूर येथील सामाजिक कार्यकर्ते गुरु हिजेरी यांना ज्वेलर्सच्या दुकानात बोलावून घेतले. आमची ओळख करुन दिली आटपाडीहून येण्याचे कारण सांगितले व म्हणाले कि, सिटी कार्पोरेशन मधून त्याना दाखला देणेची व्यवस्था करावी. त्यानंतर आम्ही त्यास अर्ज दिला त्याने तो पाहिला अर्ज आम्हास परत दिला फक्त दाखल्याची झेरॉक्स घेतली आम्हास सांगितले तुम्ही इथेच थांबा असे म्हणून मोटार सायकल घेवून निघून गेला. शिंदे यांचा मुलगाही आला तो पर्यंत आम्ही ज्वेलर्सचे मालक शिंदे यांचेशी चर्चा करीत बसलो त्यानी विजापूरचा सामाजिक व राजकिय इतिहासाची माहिती दिली. ती आम्ही ऐकत होतो.

थोडया वेळानी गुरु हिजेरी यांनी सही शिक्याचे दाखले घेवून आले आमच्या हातात सोपविले, आम्ही आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले त्यास नमस्कार घातला त्यांचे व शिंदे साहेबांचे आभार मानले एवढ्या लवकर काम होईल असे वाटले नव्हते. परंतु काम झाले होते. हणमंतराव शिंदे यांनी अग्रहाने घरी जेवणेस घेवून गेले. घरातील त्यांची पत्नी, सून, लहान नातू यांनी स्वागत केले महाराष्ट्रीयन पध्दतीने खुमासदार पध्दतीचे जेवण दिले. व्यवस्थित पाहुणचार केला घरातील सर्व माणसे चांगल्या स्वभावाची व माणुसकीची होती गांवकच्या लोकाची त्याना आस्था होती.

त्यानंतर आमची नियोजित बैठक व कार्यक्रम झालेनंतर आम्ही गोल घुमट पाहाणेसाठी रिक्षाने गांधी चौकात आलो. गांधी चौक हे विजापूर मध्ये रहदारची मोठे ठिकाण आहे. अनेक रस्ते त्या ठिकाणी येवून मिळतात सदैव गजबजलेला भाग आहे. विजापूर येथे इतिहासाच्या बाबी अनेक ठिकाणी पाहायाला मिळतात. विजापूर मध्ये कन्नड, हिंदी, मराठी भाषा बोलली जाते आम्हाला शक्यतो कुठेही भाषेची अडचण निर्माण झाली नाही. मिरज सारखे वातावरण दिसून येते. विजापूर येथे रिक्षाचे प्रमाण जास्त आहे. भौगोलिक परिस्थिती मध्ये जमिनी चांगल्या प्रतीच्या आहेत. काही ठिकाणी खडकाळ जमिन आहेत पाण्याचे प्रमाण म्हणावे तेवढे नाही कृष्णा नदी ६० कि.मि. वरुन वाहते. आलमट्टी धरण जवळ आहे. औध्योगिक बाबीत विजापूर येथे मोठे कारखाने नाहीत. महानगर पालिका असून रस्ते बरोबर नाहीत काही ठिकाणी गरीबीचे दर्शन दिसून येते.

गांधी चौकातून आम्ही रिक्षाने निघालो विजापूर शहाराचे ऐतिहासिक ठिकाण म्हणजे गोल घुमट, गोल घुमट पहाणेसाठी तिकिट काढून आत गेलो, बॅगा ठेवल्या व आत प्रवेश केला. गोल घुमटची वास्तू पाहून प्रथम मनास समाधान वाटले गोल घुमट संपूर्ण दगडी बांधकामाची उत्कृष्ठ वास्तु पाहिली दोन गोल घुमट आहेत. दरवाज्या समोर तोफा ठेवल्या आहेत. आम्युझियम पाहण्यासारखे आहेत. मोकळया जागेत विस्तृत गार्डन आहे. इतिहासाकलिन वास्तूची रचना, घडीव बांधकाम अख्खे दगडी शिळा, कोरीव बांधकाम उंच चबुतरे वर हवा येणेची अप्रतिम सोय केली आहे. बांधकामाची उत्कृष्ठ वास्तू पाहणेस मिळाली एक आवाज पाच ते सात वेळा घुमतो आदिलशहाच्या कालखंडातील गोल घुमट हि ऐतिहासिक वास्तु पाहाण्याचे समाधान मिळाले. विजापूरला सध्या विजेयपूर म्हणूनही
ओळखले जाते.

गोल घुमट वास्तू पाहून झाले नंतर रिक्षाने बस स्टैंड वर आलो विजापूर ते जत गाडीने आलो. जतहून भिवघाट येथे उतरुन आटपाडीस आलो. आमचा विजापूरचा प्रवास फलदायी, सुखकारक झाला आहे.

कळावे,
आपला विश्वासू,
आयु. विलास खरात
सचिव,
साहित्यरत्न डॉ. शंकरराव खरात
प्रतिष्ठान, आटपाडी, जि. सांगली.
महाराष्ट्र, मो.नं. 9284073277


Back to top button
Don`t copy text!