कलिंगडच्या आडून गोमांसाची वाहतूक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, खंडाळा, दि. 18 : पाडेगाव, ता.खंडाळा गावच्या हद्दीत पाडेगाव टोलनाका फिक्स पॉईटवर नाकाबंदी करीत असताना फलटण बाजूकडून नीरा बाजूकडे पिकअप गाडीतून कलिंगडच्या आडून गोमांसाची वाहतूक करत असल्याप्रकरणी लोणंद पोलिसांनी सुमारे 1 लाख 60 हजार रूपये किंमतीचे 800 किलो गोमांस जप्त केले आहे.  या प्रकरणी दोघा जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

पाडेगावच्या हद्दीत पाडेगाव टोलनाका फिक्स पॉईटवर नाकाबंदी करीत असताना फलटण बाजुकडून नीरा बाजुकडे एक अशोक लेलॅण्ड कंपनीची पिकअप गाडी (क्र. एम. एच. 14 एफटी 0668) मधुन दिशाभूल करण्यासाठी पाठीमगील बाजूस कलिंगड भरून पुढील बाजूस बिगर परवाना गोमांस भरून अजिम पिरअहमद शेख (वय 25 रा. बाभळगाव, ता.औरद, जि. विदर, राज्य कर्नाटक व जय परम फुलेल (वय 18 रा.जुनी भाजीनड बिड, जि.बिड हे तोंडास मास्क न लावता वाहनाने गोमासाची वाहतूक करताना आढळून आले. या प्रकरणी पोलीस कर्मचारी अमोल अडसुळ यांनी फिर्याद दिली आहे. सहाय्यक फौजदार महामुलकर तपास करीत आहेत. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!