तृतीयपंथीयांनी ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळविण्यासाठी नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावेत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२८ जानेवारी २०२२ । सातारा । तृतीयपंथीयांनी कल्याण व हक्कांचे संरक्षण अंतर्गत सातारा जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळविण्यासाठी नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन या वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव तथा सहायक आयुक्त श्री. नितीन उबाळे यांनी केले आहे.

तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम 2019 मधील नियम 2020 अंतर्गत विभग 6 व 7 नुसार जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र अदा करण्याची तजवीज आहे.

सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभाग, मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत राष्ट्रीय तृतीयपंथीय पोर्टल सुरु करण्यात आले आहे. त्यास सातारा जिल्ह्यातून प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झालेली असून जिल्ह्यातील पहिल्या तृतीयपंथीयांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. https://transgender.dosje.gov.in/ या पोर्टलच्या (National Poratl For Transgender Persons) माध्यमातून जिल्ह्यातील उर्वरित तृतीयपंथींयांनीही वेबसाईटवर भेट देवून अप्लाय ऑनलाईन यावर आपला युजर आयडी व पासवर्ड तयार करुन आपली सर्व माहिती भरावी.

ऑनलाईन अर्जासोबत आयकार्ड साईज फोटो, स्कॅन केलेली सही, आपण तृतीयपंथीय असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र व इतर आवश्यक कगदपत्रे अर्जासोबत संलग्न करावीत.


Back to top button
Don`t copy text!