अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांची बदली


दैनिक स्थैर्य | दि. ३ ऑक्टोबर २०२३ | सातारा |
अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांची पिंपरी चिंचवड येथे बदली झाली असून त्यांच्या जागी आँचल दलाल यांची नियुक्ती झाली आहे. दलाल यांना दुसर्‍यांदा सातार्‍यात काम करण्याची संधी मिळाली आहे.

आँचल दलाल या सातार्‍यात सहायक पोलिस अधीक्षक म्हणून पूर्वी कार्यरत होत्या. वर्षभरापूर्वी त्यांची सांगली येथे बदली झाली होती. आता पुन्हा त्या सातार्‍यात येत असून अप्पर पोलिस अधीक्षकपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. दलाल या जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या पत्नी आहेत.


Back to top button
Don`t copy text!