दैनिक स्थैर्य । दि. २३ ऑगस्ट २०२२ । सातारा । कास पठारावरील अतिक्रमणांना नोटीस बजाविणाऱ्या साताऱ्याच्या तहसीलदार आशा होळकर यांची बदली झाली आहे . कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक शाखा येथे त्यांची बदली करण्यात आली आहे होळकर यांच्या जागी जिल्हा पुरवठा शाखेचे सहाय्यक पुरवठा अधिकारी राजेश जाधव यांना साताऱ्याचे तहसीलदार म्हणून पदभार देण्यात आला आहे
महसूल प्रशासनाचे सहसचिव डॉक्टर माधव वीर यांच्या आदेशानुसार हे बदलीचे आदेश बजावण्यात आले आहेत याशिवाय संजय गांधी निराधार योजनेचे उपजिल्हाधिकारी रणजीत देसाई यांची मुंबई मंत्रालय येथे बदली झाली आहे राज्यात शिंदे गट आणि भाजप युतीचे सरकार स्थान आपण होताच राज्यात महसूल विभागाच्या बदल्याचे सत्र सुरूच आहे
जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीनंतर महसूल प्रशासनातील तहसीलदार पदांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे . सातारा महसूल विभागातील बदल्यांचा ईमेल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य प्रशासन विभागाला पाठवला आहे .यामध्ये काही दिवसापूर्वी कास पठारावरील अतिक्रमणांना नोटिसा बजावून ते अतिक्रमण काढण्यासाठी सात दिवसाची मुदत देणाऱ्या साताऱ्याच्या कर्तव्यदक्ष तडफदार तहसीलदार आशा होळकर यांची कोल्हापूरला बदली झाली आहे ही बदली जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेमध्ये तहसीलदार पदावर करण्यात आली आहे साताऱ्याची तहसीलदार म्हणून जिल्हा पुरवठा विभागाचे सहाय्य पुरवठा अधिकारी राजेश सदाशिव जाधव यांच्याकडे तहसीलदार पदाचा पदभार देण्यात आला आहे पदाधिकाऱ्यांना तात्काळ पदस्थापनेच्या पदावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत
22 फेब्रुवारी 2019 मध्ये तत्कालीन तहसीलदार निल प्रसाद चव्हाण यांची बदली झाल्यानंतर आशा होळकर यांनी सातारा तहसीलदार पदाचा चार्ज स्वीकारला होता झिरो पेंडन्सी आणि पारदर्शक कारभार म्हणून आशा होळकर यांनी आपला चांगलाच धाक निर्माण केला होता विशेषतः सातारा तालुक्यातील वाळू चोरीच्या प्रकरणांमध्ये त्यांनी कणखर भूमिका घेतली होती अनेक बेकादेशीर उत्खननांना त्यांनी चांगलाच चाप लावला करोनाच्या काळामध्ये सुद्धा सातारा शहरातील आणीबाणीची परिस्थिती त्यांनी उत्कृष्टरित्या हाताळली आठवड्यापूर्वीच कास पठारावरील 124 बांधकामांना त्यांनी आपले बांधकाम का पाडण्यात येऊ नये अशा आशयाच्या नोटिसा पाठवून एकच खळबळ उडवली होती अशा पार्श्वभूमीवर त्यांची कोल्हापूरला बदली झाल्याने पुन्हा उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली मात्र प्रत्यक्षात या रुटीन बदल्या असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले .
जिल्हा पुरवठा शाखेच्या राजेश सदाशिव जाधव यांना साताऱ्याचे तहसीलदार म्हणून पदभार देण्यात आल्याने महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे संजय गांधी निराधार योजनेचे उपजिल्हाधिकारी रणजित देसाई यांची मंत्रालयामध्ये समकक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे देसाई यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून अनेक वंचितांना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता बदली झालेल्या संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ पदमुक्त करण्यात यावे असे निर्देश मंत्रालय प्रशासनाकडून देण्यात आले आहे