फलटण नगरपरिषदेतील अधिकारी साधना पवार यांची बदली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २९ सप्टेंबर २०२४| फलटण |
फलटण नगरपरिषदेत गेल्या साडेपाच वर्षांपासून उत्तम सेवा देणार्‍या कर्तव्यदक्ष, प्रामाणिक, मितभाषी अधिकारी साधना पवार यांची रहिमतपूर (जि. सातारा) नगरपरिषदेत बदली झाली आहे.

स्पर्धा परीक्षा देऊन २०१९ साली फलटण नगरपरिषदेत रुजू झाल्या. त्यांनी ज. वसूली, जन्म-मृत्यू, आस्थापना विभागप्रमुख म्हणून काम केले. जन्म – मृत्यू विभागप्रमुख म्हणून काम करताना झिरो पेंडन्सीचे उद्दिष्ट गाठले. नागरिकांना वेळेत सेवा देणे, कोव्हिड काळात जीवाची काळजी न करता मृत्यू दाखले देण्याच्या कामाबद्दल त्यांचे कौतुक झाले.

गेल्या दीड वर्षांपासून आस्थापना विभागप्रमुख म्हणून त्यांची कारकिर्द उल्लेखनीय ठरली. कडक शिस्तीच्या पवार यांनी कर्मचार्‍यांना शिस्त लावली. त्यांच्या अडचणी सोडवण्यास नेहमी प्राधान्य दिले. पूर्वी वेळेवर न होणारा पगार व पेंशन दरमहा १ तारखेला करण्याची पद्धत सुरू केली. अनुकंपाची वर्षानुवर्षे प्रलंबित प्रकरणे पूर्ण करून देण्यासाठी प्रयत्न केले. सफाई कर्मचार्‍यांना लाड-पागे नियुक्ती आदेश, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत प्रशिक्षणार्थी यात सातारा जिल्ह्यात फलटण नगरपालिका पहिली ठरली. कर्मचार्‍यांना कायम आदेश, कामकाजाची सुयोग्य आखणी यामुळे नगरपालिकेतील कर्मचार्‍यांच्या मनात त्यांनी आदराचे स्थान निर्माण केले होते.


Back to top button
Don`t copy text!