कोरेगावच्या प्रांताधिकारी यांची बदली; राज्यातील उपजिल्हाधिकरी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या


स्थैर्य, सातारा : कोरेगाव येथील उपविभागीय अधिकारी म्हणजेच प्रांताधिकारी कीर्ती नलावडे यांची सातारा जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून बदली करण्यात आलेली आहे. तर सोलापूरच्या उपविभागीय अधिकारी म्हणजेच प्रांताधिकारी ज्योती पाटील यांची कोरेगावच्या प्रांताधिकारी पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. 

महाविकास आघाडीच्या सरकारकडून उपजिल्हाधिकरी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. सुमारे २२ अधिकाऱ्यांच्या बदल्या महाविकास आघाडीच्या सरकारकडून करण्यात आलेल्या असल्याची माहिती समोर येत आहे. आपला कालावधी पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने सदरील बदल्या करण्यात आलेल्या आहेत. 

याच संवर्गातील ज्या अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला नाही अश्यांच्या बदल्या ह्या मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्या संमतीसाठी पाठवण्यात आलेल्या असून मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांची संमती मिळाल्यानंतर ज्या अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला नाही अश्यांच्याही बदलाचे आदेश निर्गमित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून पुढे येत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!