फलटण कृषी महाविद्यालयात आळंबी व्यवसायाचे प्रशिक्षण संपन्न


दैनिक स्थैर्य | दि. 30 जून 2025 | फलटण | येथील फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालयांमध्ये बीएससी कृषीच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांना कौशल्य विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत आळंबी उत्पादन तंत्रज्ञानाचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येते. सदरील प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले आहे.

सदरील प्रशिक्षणामध्ये आळंबी उत्पादन तंत्रज्ञानाचे व्यवसायाचा आराखडा तयार करणे, प्रस्ताव तयार करणे, आळंबी उत्पादनासाठी लागणारे कंपोस्ट खत तयार करणे, आळंबीचे बिजाई लावणे, केसिंग करणे आणि कापणी करणे, आळंबी उत्पादनाची विक्री करणे व त्यासाठी लागणारे पॅकेजिंग मटेरियलची उपलब्धता याविषयी माहिती मिळवणे, आळंबी व्यवसायातील स्वच्छता व जमा खर्च ताळेबंद तसेच उत्पादनामध्ये येणाऱ्या विविध अडचणी व त्या अडचणींचे निरासरण करणे या सर्व बाबींवर सखोल असे मार्गदर्शक विद्यार्थ्यांना दिले जाते. विद्यार्थ्यांच्या या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आळंबीचे उत्पादनाबाबत सविस्तर माहिती दिली जाते.

यासोबतच आळंदीचे मानवी जीवनातील आहाराचे महत्व व मानवी आरोग्यातील विविध व्याधींवर होणारे गुणकारी उपयोग अशा प्रकारे आळंबी उत्पादनाची परिपूर्ण तांत्रिक मार्गदर्शन हे फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कृषी महाविद्यालयामध्ये दिली जाते.

विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्रातील उद्योजकता विकसित करून स्वतःचे कृषी उद्योग उभारावेत व यशस्वी कृषी उद्योजक फलटण तालुक्यामध्ये तयार व्हावेत हा यामागील उद्देश आहे.

सदरील प्रशिक्षण कार्यक्रम हा कृषी विकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. पी ए जगदाळे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येते.


Back to top button
Don`t copy text!