दैनिक स्थैर्य | दि. १४ मार्च २०२३ | फलटण |
महिला आर्थिक विकास महामंडळ सातारा, ओमसाई लोकसंचलित साधन केंद्र बुरूड गल्ली, फलटण येथे दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या वतीने सोमवार, दि. १३/०३/२०२३ रोजी PMFME योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेण्यात आले. सदर महिलांना PMFME योजनेतून एकूण ११,८०,००० /-निधी CLF खातेवरून वितरित झाला आहे.
यावेळी फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. संजय गायकवाड सर, व्यवस्थापक श्री. शशिकांत शिरतोडे सर, व्यवस्थापक श्री. मोहन कुमार शिंदे सर, पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रकिया उद्योग योजनेचे प्रशिक्षक श्री. निकम सर, सातारा श्री. शिरीष मादारे सर, बी.आर.आंबेडकरचे श्री. शेखर कांबळे सर, श्री. जीवन सोनवलकर सर तसेच आदीशक्ती गुणगौरव पुरस्कार मिळालेल्या व्यवस्थापक वर्षा शिंदे मॅडम व शुभांगी निंबाळकर मॅडम उपस्थित होत्या. हर्षल जाधव सर व त्यांचे सहकारी व व अॅड. आंबेडकर इन्स्टिट्यूटचे कांबळे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओमसाई लोक संचलित साधन केंद्र फलटणच्या व्यवस्थापक सौ. शीला घाडगे मॅडम यांनी केले. प्रशिक्षणास तीन महिला बचत गटातील ३० महिला उपस्थित होत्या.