फलटण येथील निंबकर कृषी संशोधन संस्थेत पशूवैद्यकीय विद्यार्थ्यांचा प्रशिक्षणवर्ग संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २० ऑगस्ट २०२३ | फलटण |
जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने गुरू अंगददेव पशूवैद्यकीय विद्यापीठ, लुधियाना, पंजाब येथे सुरू असलेल्या ‘उद्योजकता, कौशल्य व सुधारित शैक्षणिक फलनिष्पत्ती’ या राष्ट्रीय कृषी उच्चशिक्षण प्रकल्पांतर्गत कार्यरत आराखड्याप्रमाणे ८ पशूवैद्यकीय विद्यार्थिनी व २ विद्यार्थ्यांचा चार दिवसांचा प्रशिक्षणवर्ग फलटण येथील निंबकर कृषी संशोधन संस्था (नारी) पशूसंवर्धन विभाग येथे ९ ते १२ ऑगस्ट या कालावधीत पार पडला.

या वर्गामध्ये पशू अनुवंश शास्त्रातील तत्वे, संकल्पना, सिध्दांत यावर सखोल माहिती देण्यात आली. ही तत्वे प्रत्यक्षात ‘नारी सुवर्णा’ या जुळी कोकरे देणार्‍या मेंढ्यांच्या पैदास कार्यक्रमात व भारतीय कृषी संशोधन परिषद पुरस्कृत, अखिल भारतीय समन्वित शेळी सुधार प्रकल्पांतर्गत उस्मानाबादी शेळ्यांच्या सुधार प्रकल्पात कशी वापरतात, त्याचे विवेचन प्रत्यक्ष कळप व गावभेटीत केले गेले.

या प्रशिक्षण वर्गासाठी डॉ. चंदा निंबकर, संचालिका निंबकर कृषी संशोधन संस्था, पशूसंवर्धन विभाग या प्रमुख प्रशिक्षक होत्या. डॉ. प्रदीप घळसासी, श्री. कन्हैया चव्हाण व डॉ. कौस्तुभ नातू यांनी त्यांना सहाय्य केले.


Back to top button
Don`t copy text!