दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑक्टोबर २०२२ । सातारा । नवोदित उद्योजकांच्या कल्पनांना पोषणक वातारण पुरवून त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यसाठी, त्यांच्या स्टार्टअपची स्वप्ने साकार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नविन्यता सोसायटी मार्फत महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेमध्ये सहभागी झालेल्या उमेदवारांचे दि. 13 ऑक्टोबर 2022 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, सदर बाजार, सातारा येथे जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सहभागी स्टार्टअपचे सादरीकरण सत्र (बूट कॅम्प अँड पिचिंग सेशन) सकाळी 9 ते 6 या वेळेत होणार आहे.
या सादरीकरण यात्रेमध्ये नोंदणी केलेल्या नागरिकांना स्थानिक समस्येसाठी उत्तम उपाय, कृषी, शिक्षण, सेवा, कचरा व्यवस्थापन, पाणी, स्वच्छ उर्जा, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध नाविन्यपूर्ण कल्पना व उद्योगांचे सादरीकरण जिल्हास्तरीय तज्ञ समितीसमोर करण्याची संधी दिली जाईल. पाहिल्या तीन उत्कृष्ठ सादरीकरणास अनुक्रमे रु. 25 हजार, 15 हजार व 10 हजार पारितोषिक देण्यात येईल त्याच बरोबर त्यांना राज्यस्तरावर सादरीकरण्याची संधी मिळणार आहे.
तरी इच्छुक असलेल्या नागरिकांनी आपल्या नानिन्यपूर्ण कल्पना उद्योगांबाबतची माहिती घेण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा (8308383637) येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी www.mahastartupyatra.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. या यात्रेमध्ये जास्तीत जास्त नवोदित उद्योजकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.