दैनिक स्थैर्य । दि. ०२ नोव्हेंबर २०२१ । फलटण । दिवाळीतील किल्ले बनवण्याची परंपरा ही आपल्या पूर्वजांनी आपल्या गौरवशाली इतिहासाच्या जवळ जाण्यासाठी निर्माण केलेली एक संधी आहे. सध्याच्या ‘स्मार्टफोन’ युगात किल्ले बनविण्याची ओढ कमी झाली असून किल्ले बनविण्याचे प्रशिक्षण उपक्रम निश्चितच स्तूत्य असल्याचे प्रतिपादन फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांंनी केले.
यावेळी सचिन काळुखे, अविनाश खोमणे, मनीष काकडे, नगरसेवक अजय माळवे, तुषारभाई शहा, जलमंदिर परिसरातील राजेश जाधव व इतर जेष्ठ नागरिक उपस्थित होते. सदर उपक्रमाचा परिसरातील लहान मुलेमुली, युवक युवती आणि ज्येष्ठ नागरिक या सर्वांनी किल्ले बनविण्याचा आनंद लुटला.