देऊर येथे शिकाऊ वायरमनचा विजेचा शॉक लागून मृत्यू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक, दि. ८ : देऊर, ता. कोरेगाव येथे महावितरण कंपनीत कार्यरत असणार्‍या साहिल विजय खरात (वय 21) या शिकाऊ वायरमनला वीजखांबावर चढलेल्या विजेचा शॉक लागून व पोलवरून खाली पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेला कारणीभूत असणार्‍या संबंधित महावितरणच्या तीन जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, मृत साहिल खरात हा मूळ गाव ल्हासुर्णे, ता. इंदापूर, जि. पुणे येथील आहे.  वीजवितरण कंपनीच्या वाठार स्टेशन विभागातील देऊर शाखेत गेल्या सहा महिन्यांपासून शिकाऊ वायरमन म्हणून काम करीत होता. सध्या तो सातारारोड येथील गणेश माने याठिकाणी मामाच्याकडे राहत होता. मंगळवारी (दि. 7 ) सायंकाळी पाच वाजता देऊर हद्दीतील अचानक लाईट गेल्याने वायरमन रमेश हुसेन भडकवाड आणि शिकाऊ वायरमन साहिल खरात, संदेश पवार हे तिघेजण दुरुस्तीच्या ठिकाणी गेले होते. संदेश पवार लाईट बंद करण्यासाठी गेला तर वीज दुरुस्तीसाठी साहिल खरात विजेच्या खांबावर चढला. मात्र, विजेचा शॉक लागल्याने तो खांबावरून पडून गंभीररीत्या जखमी झाला. त्याच्या हाताला व शरीराला भाजलेल्या जखमा होत्या. त्याला उपचारासाठी पिंपोडे बुद्रुक येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तत्पूर्वी त्याचा मृत्यू झला होता.

या घटनेने साहिल खरात याच्या नातेवाइकांनी घटनास्थळी व पोलीस स्टेशनला धाव घेतली. स्वतः वायरमन गणेश भडकवाड असताना सुद्धा साहिल खरात या शिकाऊ कर्मचारी वायरमनला विजेच्या खांबावर कसे चढून दिले, तसेच खांबावर विद्युत वाहक बंद करण्याचा परवाना न घेता व लाईट बंद न करता शिकाऊ वायरमनला वीज पोलवर चढवल्याने खरात याचा मृत्यू झाला असल्याची व याला संबंधित अधिकार्‍यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याची तक्रार साहिल खरात याचे चुलते भाऊसाहेब खरात यांनी दिली आहे.

वायरमन गणेश भडकवाड वाठार स्टेशनचे वरिष्ठ अभियंता उत्तम जगन्नाथ मंचरे, शाखा अभियंता सागर प्रकाश पवार या तिघांविरुद्ध दिली आहे. सदर तिघांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, काल रात्री आठ वाजता साहिल याचे पिंपोडे बुद्रुक येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. आज दुपारी बाराच्या सुमारास नातेवाइकांनी साहिलच्या मृत्यूस जबाबदार अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला.

या घटनेचा पुढील तपास वाठार स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे करीत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!