स्थैर्य, वडुज, दि.१६: हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज, महात्मा जोतिबा फुले प्राथमिक शाळा, प्रेरणा शालेय पूर्व केंद्र,वडूज या सर्वाच्या जडणघडणीत कार्यालयीन बाबीची सर्व बाजू भक्कमपणे सांभाळणारे माजी मुख्य लिपिक चंद्रकांत शंकर पोरे (भाऊ) वय ६९ वर्षे यांचे नुककेच निधन झाले.
वडिलांचे छत्र लवकर हरपलेमुळे बी.कॉम ला फर्स्ट क्लास असून सुद्धा विद्यालयात लिपिक पदी रुजू झाले. शालेय कामकाजाचा कोणताही अनुभव नसताना त्यांनी काहीच वर्षात आपल्या अभ्यासूवृतीने सर्व बाबी शिकून घेतल्या. ऑडीटचे कामकाज हा तर त्यांच्या कामाचा हातखंडा होता रोजकीर्द, खतावणी, खाजगी ऑडीट, झेडपी ऑडीट, सिनियर ऑडीटरचे ऑडीट दरवर्षी लीलया करीत असत सेवकांची मान्यता, सेवापुस्तके, सेवाज्येष्ठता यादी याशिवाय शिक्षण विभागाचे सर्व सेवाशर्ती नियमावलीतील कायदे, शासन निर्णय यांचे अभ्यासू माहितगार होते त्यामुळे संघटना आणि शिक्षणाधिकारी कार्यालयात त्यांच्या मताला अतिशय महत्च होते.
ज्यांनी खऱ्या अर्थाने हुतात्मा शैक्षणिक संकुल व वडूज शिक्षण विकास मंडळ, वडूज यांच्या सर्वांगीण प्रगतीत मोलाची कामगिरी बजविणाऱ्या पोरेभाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली. पोरे कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ ईश्वर देवो.