स्थैर्य, सातारा, दि. 04 : कास तलावच्या उंची वाढवण्याच्या भिंतीचा भराव पावसाळ्यात वाहतुकीच्या पुलावर येण्याचा धोका या पावसाळ्यातही कायम असुन संबधीत जलसंधारण विभाग बांधकाम विभाग संबधीत कॉन्ट्रटर व लोकप्रतिनीधी यांनी तात्काळ लक्ष घालुन मातीचा भराव पुलांवर वाहुन येऊन कास बामणोली जुंगटी तेटली कडे जाणारी वाहतुक पावसाळ्यात बंद पडणार नाही यासाठी तात्काळ पावसाआगोदर उपाययोजना कराव्यात अशी मागणी परिसरातील नागरीकांतुन व्यक्त होत आहे .
सातारकरांना मुबलक पाणी मिळण्यासाठी कास तलावच्या भिंतीची उंची वाढवण्याचे काम दोन वर्षापासुन प्रगपतीपथावर सुरु आहे गेल्यावर्षी निम्याहुन आधीक काम पुर्ण झाले असुन या वर्षि कामाला पाहीजे तशी गती न मिळाल्याने काम अपुर्ण असुन धरणांच्या सांडव्यावरून वाहणाया पाण्याच्या प्रवाहासमोर व दोन्ही बाजुला नवीन भिंतीच्या मातीचा भराव मोठया प्रमाणात असुन हा भराव गेल्यावर्षि वाहतुकीच्या पुलावर वाहुन गेल्यामुळे पुलाच्या मोया मातीने पुर्ण बंद झाल्याने व मातीचा ढीग पुलावर वाहुन आल्याने पाण्याचा मोठा प्रवाह त्यावरून वाहत असल्याने गेल्यावर्षि कास बामणोली जुंगटी परिसरात जाणारी वाहतुक पुर्णपणे दिड महिनाभर ठप्प झाल्याने भागातील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले होते तर पर्यटनालाही मोठा फटका बसला होता त्यामुळे यावर्षिही धरणाच्या भिंतीच्या भरावाची तिच परिस्थीती असुन सबंधीतांनी तात्काळ लक्ष घालुन पाण्याच्या प्रवाहाला मोकळी जागा करून भिंतीच्या मातीच्या भरावाला मोठमोठे दगड लावुन भराव वाहुन येणार नाही यासाठी तात्काळ पावसा आगोदर खबरदारीच्या उपाय योजना कराव्यात आशी मागणी वाहनधारंकासह भागातील जनतेतुन व्यक्त होत आहे.