वाहतूक पोलीसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई; रुपये 21 हजार 600 दंड वसुली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 29 नोव्हेंबर 2024 । फलटण । शहरातील एस.टी.बसस्थानक व कोळकी (ता.फलटण) येथील तिकाटणे परिसरात वाहतूक पोलीसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उचलत रुपये 21 हजार 600 ची दंड वसुली करण्यात आली.

फलटण शहर पोलीस ठाणेहद्दीत वारंवार होत असलेल्या वाहतुक कोंडी होत असल्याने फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी फलटण शहर पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांना कारवाईबाबत आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक नलवडे, पोलीस उपनिरीक्षक जगताप, पोलीस अंमलदार स्वप्निल खराडे, वाहतुक पोलीस अंमलदार संभाजी जगताप व आरसीपी पथक यांनी नाकाबंदी करुन बेशिस्त वाहनचालकांवर सदरची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती फलटण शहर पोलीस ठाण्याकडून देण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!