वडाचे झाड पडल्याने सातारा-लोणंद रस्त्यावर वाहतूक खोळंबली


दैनिक स्थैर्य । दि. १५ जुलै २०२२ । सातारा । सातारा-लोणंद रस्त्यावर पाटखळ माथा (ता.सातारा) येथे पावसामुळे वडाचे मोठे झाड रस्त्यावरच कोसळल्याने या मार्गावर वाहातुकीचा खोळंबा झाला होता. कोसळलेले झाड बाजूला काढेपर्यंत दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास साताराहुन लोनंदकडे जाणाऱ्या राज्यमार्गावर पाटखळ माथ्याजवळ अचानक वडाचे मोठे झाड रस्त्यावरच कोसळले. कोसळलेल्या झाडाने संपूर्ण रस्ताच बंद झाला. झाड कोसळल्याने साताराहून लोणंदकडे तसेच लोणंदहून साताराकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दोन्ही बाजूने वाहनांच्या सुमारे ३ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या.
वाहतूक ठप्प झाल्याची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तद्नंतर पोलिसांनी हायवे हेल्पलाईनला पाचारण करून कोसळलेले झाड बाजूला करण्याची कारवाई केली. सुमारे ४ तासानंतर संपूर्ण झाड कापून बाजूला केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली.


Back to top button
Don`t copy text!