दैनिक स्थैर्य । दि. २७ डिसेंबर २०२१ । सातारा । ख्रिसमस आणि जोडून आलेला रविवार यामुळे सर्व पर्यटन स्थळे गजबजून गेली आहे. सातारा तालुक्याच्या पश्चिमेस अवघ्या काहीच अंतरावर असलेल्या किल्ले सज्जनगड येथे याचा प्रत्येत पहायलाच मिळाला. पार्किंगची योग्य नियोजन नसल्याने भाविक तसेच पर्यटकांना जवळपास 2 किलोमिटर वर वाहन पार्क करुन पायपिठ करत सज्जनगड गाठावा लागत होता. यामुळे भाविकांचा हिरमोड झाल्याचे दिसून येत होते.
परळी खोरे हा निसर्गाचा खजिना ओळखला जातो साताऱयापासून अवघ्या काही अंतरावरच उरमोडी जलाशयाचे विहंगम दृश्य, किल्ले सज्जनगड, ठोसेघर धबधबा, चाळकेवाडी पठार येथे सलग दोन दिवसांची सुट्टी असल्याने ही पर्यटनस्थळे गजबजून गेली आहेत. मात्र सज्जगड येथील वाहनतळ फुल्ल झाले अन् पर्यटकांनी रस्त्या लगतच पार्किंग गेल्याने येथे वाहतूक विस्कळीत झाली होती. जवळपास दोन किलो मिटर पर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. यामुळे वयोवृध्द भाविकांना पर्यटकांना पायपिट करावी लागत होती. तसेच गाडी पार्किंग वरुन वाहनधारकांमध्ये वादावादीचे प्रकारही घडत होते मात्र स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत परळी व पोलीस यंत्रणा यांचे नियोजन शून्य दिसून येत होते.
पोलिस दादा आहेत तरी कोठे ?
सलग शासकिय दोन दिवस सुट्टी असल्याने सज्जनगड भाविकांनी बहरला मात्र वाहन पार्किंगचा खेळखंडोबा झाल्याने मोठी कसरत करावी लागली तसेच ठोसेघर भागात ओल्या पाटर्य़ांही होत असतात. येथील चेकिंग करण्यासाठी पोलीस यंत्रणा कोठेचे दिसत नव्हती.