
स्थैर्य, सातारा, दि. 19 डिसेंबर : सातारा शहर हद्दीतील बॉम्बे रेस्टॉरंट चौक हा अतिशय वर्दळीचा व गर्दीचा चौक आहे. सदर चौकात पुणे, वाढे फाटा, कोरेगाव, रहिमतपूर व कराड बाजुकडून येणारे वाहनांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे बॉम्बे रेस्टॉरंट चौकात वाहतूक कोंडी होत असते. बॉम्बे रेस्टॉरंट चौकात वाहतुक कोंडी होवू नये यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी शनिवार दि. 20 डिसेंबर पासून येथील वाहतुक मार्गात बदल केले आहेत.
वाहतुकीकरीता बंदी घालण्यात आलेला मार्ग
जिल्हा परिषद चौक बाजुकडून बॉम्बे रेस्टॉरंट चौकात आल्यानंतर वाहनांना बालाजी ढाबा / फर्न हॉटेल बाजुकडे उजवीकडे प्रवेश करणेस मनाई करणेत येत आहे. पुणे/वाढे फाटा बाजुकडुन बॉम्बे रेस्टॉरंट चौकात सर्व्हिस रोडने येणारे सर्व वाहनांना बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून सातारा शहरात प्रवेश करण्यासाठी उजवीकडे वळण घेण्यास मनाई करण्यात येत आहे. कोरेगाव/एम.आय.डी.सी. बाजुकडून येणारे वाहनांना बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून सरळ शहरात प्रवेश करता येणार नाही. कराड/अजंठा चौक/एमआयडीसी (महिंद्रा शोरुम) बाजुकडून सर्व्हिस रोडने येणारे सर्व वाहनांना बॉम्बे रेस्टॉरंट चौकात सरळ प्रवेश करण्यात मनाई करण्यात येत आहे.
अजंठा चौक/फर्न हॉटेल बाजुकडून कोरेगाव / कराड बाजुकडे जाणारी वाहने यांना बालाजी ढाब्याच्या समोरील डायव्हर्शनमधून उजवीकडे प्रवेश करण्यास मनाई आहे. बाँम्बे रेस्टॉरंट चौक ते अजंठा चौक व अजंठा चौक ते बॉम्बे रेस्टॉरंट जाणारा सव्हिस रस्ता हा एकेरी वाहतुकीकरीता चालु करण्यात येत आहे. तसेच बाँम्बे रेस्टॉरंट चौक ते अजंठा चौक व अजंठा चौक ते बॉम्बे रेस्टॉरंट चे दोन्ही सर्व्हिस रस्त्याच्या बाजुस वाहने लावनेस मज्जाव करण्यात येत आहे. तसेच सदरचा मार्ग हा नो पार्किंग झोन म्हणून घोषित करणेत येत आहे.
वाहतुकीकरीता पर्यायी मार्ग
पोवई नाका / जिल्हा परिषद चौक मार्गे कोरेगाव बाजुकडे जाणारी वाहने ही बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथून सरळ कोरेगाव बाजुकडे जातील. तसेच बालाजी ढाबा / फर्न हॉटेल बाजुकडे जाणारी सर्व वाहने डायव्हर्शनचा वापर करुन अजंठा चौक बाजुकडे प्रवेश करतील. पुणे/वाढे फाटा बाजुकडुन येणारी सर्व वाहने बॉम्बे रेस्टॉरंट पुलाचे पुर्व बाजुकडुन येवून बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून उजवीकडे वळण न घेता सरळ अजंठा चौक बाजुकडे जावून डायव्हर्शनचा वापर करुन सातारा शहरात प्रवेश करतील.
कोरेगाव/ एम.आय.डी.सी. बाजुकडून येणारी वाहने ही बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथे डावीकडे वळण घेवून अजंठा चौक बाजुकडे जावून डायव्हर्शनचा वापर करुन सातारा शहरात प्रवेश करतील. अंजठा चौक/एमआयडीसी बाजुकडून महिंद्रा कंपनी शोरुम येथून बाम्बे रेस्टॉरंट चौकात येणारी वाहने ही बाम्बे रेस्टॉरंट चौकात सरळ न येता डायव्हर्शनचा वापर करुन सातारा शहरात प्रवेश करतील. अजंठा चौक / फर्न हॉटेल बाजुकडून कोरेगाव / कराड बाजुकडे जाणारी वाहने बॉम्बे रेस्टॉरंट चौकातूनच वळण घेवून कराड अजंठा चौक बाजुकडे रवाना होतील.
तरी बॉम्बे रेस्टॉरंट चौकात होणारी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी सदरचा वाहतुक मार्गातील बदल हा प्रायोगीक तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात करण्यात येत आहे. या बदलाची सर्व नागरिकांनी नोंद घेवून काही सुचना करावयाच्या असल्यास पोलीस अधिक्षक कार्यालय, वाहतूक नियंत्रण शाखा सातारा शहर येथे संपर्क करावा व या वाहतुक बदलाची नोंद घेवून सर्व नागरीकांनी पोलीस दलास सहकार्य करावे.

