दैनिक स्थैर्य । दि. १३ मार्च २०२२ । फलटण । सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गुणवरे ता. फलटण जि. सातारा येथे यशवंतराव चव्हाण जयंती निमित्त पू र्व- प्राथमिक विभागाची वेशभूषा स्पर्धा तसेच प्राथमिक विभागाची पारंपारिक वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली.
त्यामध्ये इयत्ता ३ री च्या विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा, केशभूषा, संवाद तसेच वेगवेगळ्या रंगाचे ड्रेस परिधान केले होते.
स्पर्धेत विद्यार्थ्यांनी शिवचरित्र सादर केले तसेच संतांची महती सांगितली प्राचीन संस्कृतीचे तसेच निरनिराळ्या राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडवले.
या कार्यक्रमाचे आयोजन सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव विशाल पवार, सरस्वती शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापिका संचालिका सौ. संध्या गायकवाड, सरस्वती शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. प्रियंका पवार, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सुनील अहिरे, विद्यालयाचे पर्यवेक्षक किरण भोसले, विद्यालयाच्या पूर्व-प्राथमिक विभागाच्या समन्वयिका सौ. सुप्रिया सपकाळ यांनी केले.
वेशभूषा स्पर्धेचे सूत्रसंचालन सौ. सुजाता गावडे व कु.आयेशा मुल्ला यांनी केले तर पारंपारिक वेशभूषा स्पर्धेचे सूत्रसंचालन सौ. पल्लवी गायकवाड यांनी केले. स्पर्धेचे आभार प्रदर्शन सौ. रोहिणी पवार यांनी केले.