दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑगस्ट २०२२ । मुंबई । ट्रेडस्मार्ट या भारतातील आघाडीच्या आधुनिक ऑनलाइन डिस्काऊंट ब्रोकरेज कंपनीने तंत्रज्ञानाचे पाठबळ असलेल्या ट्रेडिंग व इन्व्हेस्टमेंट अॅडवायजरी सर्विसेसचे विविध मॉडेल्स विकसित करणारी सेबी नोंदणीकृत संशोधन विश्लेषण कंपनी सेवाप्रदाता मॉडर्न अल्गोससोबत सहयोग केला आहे. ट्रेडस्मार्ट युजर्सना आता मॉडर्न अल्गोसच्या आधुनिक ट्रेडिंग सेवांची श्रेणी उपलब्ध होईल आणि ते कंपनीच्या अनुभवी व पात्र व्यावसायिकांच्या व्यापक नेटवर्ककडून विशेष मार्गदर्शन व ट्रेडिंग धोरणांचा लाभ घेऊ शकतात.
ट्रेडस्मार्ट व्यासपीठावरून शिफारसी आणि ट्रेडिंग धोरणांचा लाभ घेतल्यानंतर मॉडर्न अल्गोस ग्राहकांना एकसंधी व्यापार अनुभव प्रदान करेल. मॉडर्न अल्गोस सेवांना परिमाणात्मक आणि तंत्रज्ञान विश्लेषणाचे पाठबळ आहे. व्यासपीठ युजर्सना कार्यक्षम ऑर्डर व्यवस्थापन प्रणाली देण्यासाठी अल्गोरिदम्स व एआयवर आधारित सखोल माहितीचा वापर करते, ज्यामुळे युजर्सना त्यांचे वय, गुंतवणूक व भावी ध्येयांनुसार योग्य सानुकूल सल्ला मिळतो. अत्यंत रोचक ऑफरिंग आहे टाइम/रिस्क रिवॉर्ड/ ६५ टक्क्यांहून अधिक यशाच्या शक्यतेवर आधारित अल्गोरिदमिकली डिझाइन केलेली रेडीमेड ऑप्शन ट्रेडिंग धोरणे.
ट्रेडस्मार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विकास सिंघानिया म्हणाले, “सध्याच्या व्यवसाय स्थितीमध्ये अनेक आधुनिक ट्रेडिंग व गुंतवणूक कंपन्या दिसून येत आहे. सर्व कंपन्या प्रगत तंत्रज्ञानांचा वापर करत या प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि ग्राहकांना सर्वोत्तम युजर अनुभव देण्यासाठी स्पर्धा करत आहेत. पण या स्पर्धेमध्ये यशस्वी ठरण्यासाठी योग्य भागीदारासोबत सहयोग तितकाच महत्त्वाचा आहे. आम्हाला मॉडर्न अल्गोससोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे आणि विश्वास आहे की, हा सहयोग आम्हाला अनुभवी, तसेच नवोदित गुंतवणूकदारांना त्यांचे वैयक्तिक संशोधन व विश्लेषणानुसार सुविधा देण्यास मदत करेल.”
गुंतवणूकदार त्यांचा पोर्टफोलिओ कार्यक्षमपणे निर्माण व व्यवस्थापित करण्यासाठी मॉडर्न अल्गोसच्या इन-हाऊस इंटेलिजन्स प्रणाली व प्रगत अल्गोरिदम फिल्टर्सचा लाभ घेऊ शकतात. ट्रेडर्स व ऑप्शन धोरणकर्ते प्रगत ऑटो-ट्रेडिंग फंक्शन्सचा वापर करत धोरणांचे प्रबळ विश्लेषण व अंमलबजावणीची खात्री करू शकतात. युजर्स ऑप्शन चेन अॅनालिटिक्स, स्ट्रॅटेजी पिक्स अॅण्ड बिल्डर, स्कॅनर, विझार्ड्स, तसेच इन्ट्राडे पिक्स इन इक्विटी, फ्यूचर्स व ऑप्शन्स अशा वैशिष्ट्यांसह परिभाषित स्थितींवर त्यांचे व्यापार आपोआपपणे करू शकतात. व्यासपीठ मार्केट स्कॅनर्स, मार्जिन कॅल्क्युलेट, एसआयपी कॅल्क्युलेटर, अलर्ट्स व फ्यूचर व्हॅल्यू कॅल्क्युलेटर यांसारखे टूल्स देखील देतो.